Ad will apear here
Next
ते फक्त वडील नाहीत, माझे आयकॉनही...!
अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीच्या अर्धशतकपूर्तीनिमित्ताने अभिषेकच्या भावना

मुंबई : ‘बिग बी’ अर्थात अमिताभ बच्चन यांनी १५ फेब्रुवारी २०१९ रोजी आपल्या चित्रपट कारकिर्दीची ५० वर्षे पूर्ण केली. त्या निमित्ताने त्यांचा सुपुत्र, अभिनेता अभिषेक बच्चन याने त्यांचे टॅलेन्ट आणि त्यांचा हा प्रवास याबद्दल एक भावूक पोस्ट लिहून इन्स्टाग्रामवर काही फोटोज शेअर केले आहेत.  

‘ते माझे केवळ वडीलच नसून, माझे आयकॉनही आहेत,’ असे अभिषेकने या पोस्टमध्ये म्हटले आहे. ‘माझे वडील, एक चांगला मित्र, मार्गदर्शक, उत्तम समीक्षक, उत्कृष्ट समर्थक, माझे आदर्श, माझे हिरो... ५० वर्षांपूर्वी आजच्या दिवशी त्यांनी त्यांचा चित्रपटसृष्टीतला प्रवास सुरू केला होता आणि आजही ते काम करत आहेत. कामाच्या पहिल्या दिवशी त्यांचा जो उत्साह होता, तोच उत्साह आजही कायम आहे आणि मी तो पाहतो आहे,’ असे अभिषेकने या पोस्टमध्ये लिहिले आहे. 

इन्स्टाग्रामवर त्यांचे आणि स्वतःचे काही फोटोही अभिषेकने शेअर केले आहेत. त्यातील एका फोटोवर त्याने अमिताभ बच्चन यांना उद्देशून म्हटले आहे, ‘प्रिय पा, आज मी तुम्हाला सेलिब्रेट करत आहे, तुमच्या टॅलेन्टला सेलिब्रेट करत आहे इतकेच नाही तर तुमचे ध्येय, चिकाटी, तुमची प्रतिभा, तुमचा प्रभाव या सगळ्या गोष्टी मी आज साजऱ्या करत आहे.’ 

हे सांगत असताना अभिषेकने सकाळी घरी घडलेला एक किस्साही शेअर केला आहे. ‘सकाळी मी जेव्हा त्यांना त्यांच्या कारकिर्दीच्या अर्धशतकपूर्तीसाठी शुभेच्छा दिल्या आणि मी कामावर निघाल्याचे सांगितले आणि ते कुठे निघाले आहेत, असे मी त्यांना विचारले असता, तेदेखील कामावर निघाले असल्याचे त्यांनी सांगितले,’ असे त्याने लिहिले आहे. 

फेब्रुवारी १९६९मध्ये अमिताभ बच्चन यांनी त्यांचा पहिला चित्रपट साइन केला होता, तो म्हणजे ‘सात हिंदुस्थानी.’ त्यानंतर ‘दीवार’, ‘मर्द’, ‘शोले’, ‘डॉन’, ‘कुली’, ‘सिलसिला’, ‘अग्निपथ’ आणि अलीकडील काळातला ‘पिकू’ या काही चित्रपटांमधून अमिताभ सर्वांच्या मनात कोरले गेले ते कायमचेच. आजही त्यांचा काम करण्याचा उत्साह आणि त्यांची चिकाटी तोंडात बोटे घालण्यास भाग पाडते. 

(अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील ‘सिंड्रेला मॅन’ हा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZPEBX
Similar Posts
सोनाली बेंद्रे नव्या जोमाने पुन्हा कामावर.. मागील सहा-सात महिने कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी दोन हात करत आयुष्याची नवी इनिंग सुरू केलेली सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली बेंद्रे आता बरी होऊन मुंबईत परतली असून, तिने पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरुवात केली आहे. पुन्हा काम सुरू केल्याची भावना खूप अद्भूत असल्याचे सांगत इन्स्टाग्रामवर यासंदर्भात तिने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे
२५ वर्षांनी ‘बिग बी’ मराठी चित्रपटात मुंबई : बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे तब्बल २५ वर्षांनंतर एका मराठी चित्रपटात दिसणार आहेत. बिग बी यांच्या तमाम मराठी चाहत्यांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे. मिलिंद लेले दिग्दर्शित ‘ए बी आणि सी डी’ या चित्रपटात ते अभिनेते विक्रम गोखले यांच्या मित्राच्या भूमिकेत दिसणार आहेत.
इतर कोणत्याही पुरस्कारापेक्षा हा सन्मान मोठा : मनोज वाजपेयी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने बॉलीवूडमध्ये आपली एक विशेष जागा निर्माण करणारे अभिनेते मनोज वाजपेयी यांना नुकताच यंदाचा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे. देशातील चौथ्या क्रमांकाचा नागरी सन्मान मिळाल्याने आपण अतिशय आनंदी असल्याचे मनोज यांनी म्हटले आहे.
‘तीन’ : गुंतागुंतीचं, पण आकर्षक कोडं दिग्दर्शक सुजॉय घोषने निर्माता म्हणून बनवलेला ‘तीन’ हा चित्रपट म्हणजे २०१३मध्ये आलेल्या ‘मोन्ताज’ या कोरियन चित्रपटाचा रिमेक आहे. अत्यंत मोजके संवाद, घटनाप्रधान कथानक आणि पटकथा. व्यवस्थित वेळ देऊन केलेली, तरीही अजिबात संथ न वाटणारी प्रसंगांची उत्कंठावर्धक रचना, यांमुळे संपूर्ण सिनेमा कायम गंभीर टोन असूनही अत्यंत मनोरंजक वाटतो

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language